Anjaneri Fort History: नाशिकमधील अंजनेरी किल्ला 'या' देवाचं आहे जन्मस्थान, काय आहे त्यामागचा इतिहास? वाचा

Dhanshri Shintre

अंजनेरी किल्ला

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत स्थित अंजनेरी किल्ला ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा स्थळ मानला जातो.

हनुमानाचे जन्मस्थान

पौराणिक मान्यतेनुसार अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान आहे. अंजनीच्या नावावरूनच या पवित्र स्थळाला अंजनेरी असे नाव देण्यात आले.

भौगोलिक स्थान

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर, नाशिक शहरापासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर अंजनेरी फाटा नावाचे ठिकाण आहे.

समुद्रसपाटीपासून उंची

अंजनेरी किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४,२६४ फूट उंचावर स्थित असून, निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

हनुमानाचा जन्म

हिंदू पुराणांनुसार, अंजनी मातेनं अंजनेरी पर्वतावर कठोर तपस्या केली आणि याच ठिकाणी भगवान हनुमानाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.

अंजनी मातेचे मंदिर

अंजनेरी हे जगातील एकमेव स्थान मानले जाते, जिथे अंजनी मातेला समर्पित एकमेव मंदिर आहे.

नाव कसे पडले?

अंजनेरी हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते आणि त्यांचे नाव त्यांच्या आई अंजनीच्या नावावरून ठेवले गेले आहे.

जैन लेणी

अंजनेरी किल्ल्यावर बाराव्या शतकातील १०८ प्राचीन जैन लेणी असून, त्यामुळे या स्थळाला मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

ऐतिहासिक संदर्भ

अंजनेरी किल्ला मुघल आणि मराठा राजवटींचा साक्षीदार राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याचे बळकटीकरण केले होते

सुळका आणि तलाव

अंजनेरी किल्ल्यावर एक सुंदर नैसर्गिक तलाव असून, त्याच्या परिसरात एक उंच सुळका देखील आकर्षण ठरतो.

सर्वोत्तम वेळ

पावसाळ्यात अंजनेरी परिसर हिरवागार बनतो आणि अनेक धबधबे आकर्षण ठरतात. त्यामुळे जुलै ते जानेवारी हा काळ किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो.

NEXT: हिरवागार निसर्ग अन् ट्रेकिंगसाठी खास! तांदुळवाडी किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या

येथे क्लिक करा