Kuderan Waterfall: ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हा' पांढरा शुभ्र धबधबा; येणाऱ्या विकेंडला नक्की भिजून या

Surabhi Jayashree Jagdish

कुडेरान धबधबा

कुडेरान धबधबा बदलापूर जवळ असलेला एक प्रसिद्ध आणि साहसी ट्रेकसाठी ओळखला जाणारा धबधबा आहे.

आकर्षण

सह्याद्री पर्वतरांगेत असून पावसाळ्यात हिरवळ, दगडधोंडे आणि कोसळणारे पाणी यामुळे पर्यटकांचं आकर्षण ठरतो.

कुडेरान धबधब्याची खासियत

कुडेरान धबधबा हा डोंगराच्या माथ्यावरून झपाट्याने कोसळतो. या धबधब्याचा ट्रेकिंग रस्ता जंगलातून आणि चढाईचा असून थोडा मध्यम आहे.

मुंबईहून कसं जाल?

सर्वप्रथम मुंबई किंवा ठाणे इथून रेल्वेने बदलापूर रेल्वे स्थानक गाठा. बदलापूर स्टेशनहून अंबरनाथ रोडने मुळगावकडे जा.

बेस व्हिलेज

मुळगाव हे कुडेरान ट्रेकसाठी बेस व्हिलेज आहे. मुळगावात गाडी पार्क करून पुढे चालत ट्रेक सुरु करावा लागतो.

ट्रेक

ट्रेक सुमारे एक ते दीड तासाचा असून जंगलातून व खडकांवरून वाट आहे.

काळजी घ्या

पावसात वाटेवर ओढे वाहत असल्यामुळे काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे.

Chanakya Niti: पत्नी असूनही पुरुष इतर मुलींच्या प्रेमात का पडतात? चाणक्यांनी सांगितली कारणं

Married Men
येथे क्लिक करा