ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जन्माष्टमीच्या दिवशी सुंठवडा फक्त प्रसाद म्हणूनच दिला जात नाही तर, त्याचे आयुर्वेदिक महत्त्व देखिल आहे.
यामधील सुंठ, गुळ, तूप असे पदार्थ सर्दि-खोकला, पचनाच्या समस्या, अंगदुखी सारख्या आजारांवर उपाय म्हणून काम करतात.
सुंठ पावडर, गुळ, तूप, सुका मेवा, खसखस, वेलची पावडर
एका कढईत थोड्या गरम तूपात खसखस भाजून घ्या. बाजूला काढून ठेवा.
त्याच कढईत बारिक चिरलेला सुका मेवा भाजून घ्या.
गुळात २-३ चमचे पाणी घालून मध्यम घट्ट पाक तयार करा.
गुळाच्या पाकात सुंठ पावडर आणि भाजलेला खसखस व सुका मेवा घालून मिश्रण तयार करा.
मिश्रण गरम असतानाच हाताला थोडे तूप लावून लहान लाडू वळून घ्या.
तयार झालेल्या सुंठवड्याचा श्री कृष्णाला नैवेद्य दाखवा आणि प्रसाद तयार करा.
Next : Janmashtami 2025: लाडक्या कान्हाला '56 भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?