Krishna janmashtami 2026: घरी कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पूजा विधी

Manasvi Choudhary

कृष्ण जन्माष्टमी

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण जन्माष्टमी हा सण घरोघरी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो.

Krishna janmashtami 2026

बाळकृष्णाची पूजा

जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री कृष्णाचा जन्मसोहळा साजरा केला जातो. ती संपूर्ण पूजा विधी पद्धत या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Krishna janmashtami 2026

अशी सुरू झाली परंपरा

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथिला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता म्हणून जन्माष्टमीला मध्यरात्री पूजा केली जाते. कृष्ण जन्माष्टमी हा सण यंदा 4 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात साजरा होणार आहे.

Krishna janmashtami 2026

शुभ मुहूर्त

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त 4 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल ते 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 43 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Krishna janmashtami 2026

घर आणि देवघर स्वच्छता

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर आणि विशेषतः देवघर स्वच्छ करा. देवघरासमोर आणि मुख्य दारावर सुंदर रांगोळी काढा आणि आंबेच्या पानांचे तोरण लावा.

Cleaning the House

बाळकृष्णाची सुंदर सजावट आणि अभिषेक

पाटावर किंवा पाळण्यात पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवा.

Abhishek & Decoration

बाळकृष्णाला सजवा

जन्माष्टमीच्या रात्री मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्म साजरा करण्याची परंपरा आहे. त्यावेळी बाळकृष्णाला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने स्नान घाला त्यानंतर कृष्णाला सुंदर नवीन वस्त्र, मुकुट, बांसुरी आणि वैजयंती माला घालून सजवा.

बाळकृष्णाचा पाळणा हलवणे

रात्री १२ वाजता कृष्णजन्मोत्सव साजरा करण्यासाठी पाळण्यात बाळकृष्णाला ठेवून हळुवार पाळणा हलवावा. महिलांनी गाणी आणि आरती म्हणा.

Swinging the Cradle

उपवास

अनेकजण दिवसभर निर्जला किंवा फलाहार उपवास करतात. मध्यरात्री कृष्णाच्या जन्मानंतर आरती करूनच उपवास सोडण्याची परंपरा आहे.

Fast & Resolution | yandex

नैवैद्य आणि प्रसाद

श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असणारे माखन-मिश्री , धने-गुळाची पंजीरी आणि फळांचा नैवैद्य दाखवावा.

Offering Naivedhya

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits Of Reading | Canva

NEXT: Ginger Tea Vs Ginger Water: सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा चहा की आल्याचे पाणी? काय आहे अधिक फायदेशीर?

Ginger Tea Vs Ginger Water
येथे क्लिक करा...