Manasvi Choudhary
आले स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यापैकी एक आहे. अनेकजण सकाळी रिकाम्यापोटी आल्याचा चहा आणि आल्याचे पाणी पितात.
मात्र आरोग्यासाठी आल्याचा चहा की आल्याचे पाणी नेमके काय फायदेशीर आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जर तुम्हाला सकाळी हेल्दी ड्रिंक प्यायचे असेल तर तुम्ही आल्याचे पाणी निवडा. आल्याच्या चहापेक्षा आल्याचे पाणी अधिक फायदेशीर ठरेल.
आल्याचे पाणी प्यायल्याने सकाळी होणारी अॅसिडीटी, छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते.
आल्याचे पाणी शरीराची चरबी जलद गतीने कमी करण्यास मदत करते यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही सकाळी आल्याचे पाणी प्या.
आल्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी आल्याचे पाणी प्या.
कोमट पाण्यात किसलेले आलं किंवा आल्याचा रस आणि थोडे लिंबू पिळून हे पाणी तयार करा.
आल्याचा चहा चवदार लागतो यामुळे मूड फ्रेश होतो मात्र सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे आरोग्यावर परिणाम देखील होऊ शकतो.
सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही दुध आणि साखर घालून आल्याचा चहा प्यायल्याने अॅसिडिटी, छाचीच मळमळ होण्याची शक्यता अधिक असते.
आल्याचा चहा सकाळी रिकाम्या पोटी पिण्याऐवजी तुम्ही नाश्त्यानंतर किंवा दुपारी संध्याकाळच्या वेळी पिणे अधिक योग्य असेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.