Dahi Handi 2026: कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी का फोडतात? जाणून घ्या प्रथा

Manasvi Choudhary

दहीहंडी उत्सव

कृष्ण जन्माष्टमी नंतर 'दहीहंडी' चा उत्सव साजरा केला जातो. यंदा दहीहंडीचा उत्सव 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

Dahi Handi 2026 | google

दहीहंडी फोडण्याची प्रथा काय?

कृष्णजन्मानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी का फोडली जाते. यामागे कोणती पौराणिक प्रथा आहे? हे तुम्हाला माहित आहे का?

Dahi Handi 2026 | Social Media

श्रीकृष्ण जन्माष्टमी

श्रावण महिन्यात अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.

Dahi Handi 2026 | Social Media

दहीहंडीचा उत्साह

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो.

Dahi Handi 2026 | pintrest

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहानपणी खोडकर होते. त्यांना लोणी, दही आणि दूध खाण्याची आवड होती.

Dahi Handi 2026 | Google

अशी सुरू झाली पंरपरा

गोकुळात गेल्यानंतर गोपींकांच्या घरातील ताजे लोणी खाण्यासाठी कान्हा आपल्या मित्रांसोबत जायचे आणि दूध, दहीचे भांडे घ्यायचे. गोपीका त्रस्त होऊन त्यांनी आपल्या घरातील लोणी आणि ताक मडक्यात भरून अतिशय उंच जागी टांगून ठेवले.

Dahi Handi 2026 | Saam Tv

हे आहे मुख्य कारण

मात्र बाळकृष्ण हे हुशार होते. त्यांनी मित्रमंडळींसोबत हुशारीने मानवी साखळी तयार करून सर्व सवंगड्यांसोबत लोण्यावर ताव मारला. याच बालपणीच्या आठवणीत दरवर्षी कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

Dahi Handi 2026 | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Krishna janmashtami 2026: घरी कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पूजा विधी

Krishna janmashtami 2026
येथे क्लिक करा..