ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोयना वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व निसर्गरम्य अभयारण्य आहे. घनदाट जंगल, धबधबे आणि वन्यजीवांसाठी ओळखले जाते.
कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यात आहे. हे कोयना धरणाजवळ वसलेले मोठे अभयारण्य आहे. येथे अनेक पर्यटक भेट देण्यास येतात.
तुम्ही येथे ट्रेनने जावू शकता. सातारा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तसेच तुम्ही मुंबईहून पुण्याला जावून सातारा बस पकडू शकता. साताऱ्याला उतरल्यावर तुम्ही टॅक्सी किंवा बसने कोयना अभयारण्याला पाहोचाल.
उंच डोंगर, खोल दऱ्या आणि नद्या हे येथील वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना निसर्गाची आवड आहे अशा लोकांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
या अभयारण्यात वाघ, बिबट्या,सांबर,भेकर आणि अस्वल असे प्राणी आढळतात. येथे अनेक प्रकारचे प्राणी राहतात. तसेच पर्यटक एक जीप बुक करुन गाईड सोबत जंगल सफारी करण्यास निघतात आणि तेथील सगळी माहीती जाणून घेतात.
येथे विविध जातींचे पक्षी पाहायला मिळतात. साप, घोरपड, सरडे यांसारखे सरपटणारे प्राणीही या अभयारण्यात पाहायला मिळतात.
कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना धरणामुळे परिसर अधिक निसर्गरम्य झाला आहे.
येथे हातात दुर्बीण आणि कॅमेरे घेवून जंगल सफारी आणि ट्रेकिंग करता येते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ भेटीसाठी उत्तम आहे. तसेच पावसाळ्यात हा परिसर खूप हिरवागार दिसतो. आजूबाजूला हिरवागार डोंगर झाडी ही दृश्य बघण्यास छान वाटते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.