Shreya Maskar
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची, पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, शेंगदाण्याचा कूट, जिरं, ओवा, तेल, साखर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्या. नंतर बारीक चिरूनही घ्या. त्यानंतर लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या ठेचून घ्या.
कोथिंबीर एका बाऊलमध्ये काढून त्यात पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
नंतर यात लसूणची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, जिरं, ओवा, तेल आणि साखर घालून मिक्स करा.
मिश्रणात तांदळाचे पीठ, बेसन आणि पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवा.
तयार मिश्रण एका ताटात पसरवा. ताटाला आधी तेल लावून घ्या. त्यानंतर तीन शिटी काढून मिश्रण शिजवून घ्या.
मिश्रण थंड झाले की, त्याच्या वड्या पाडा. आता तेल गरम करून त्यात कोथिंबीरच्या वड्या तळून घ्या.
गरमागरम आणि कुरकुरीत कोथिंबीर वडीचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. फक्त १० मिनिटांत हॉटेल स्टाइल पदार्थ घरी बनेल.