Kothimbir Cream Soup: हिवाळ्यात घ्या गरमागरम कोथिंबीर क्रीम सूपचा आस्वाद; घरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट सूप!

Shruti Vilas Kadam

साहित्य

कोथिंबीर क्रीम सूप बनवण्यासाठी एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर, एक कप दूध, दोन चमचे फ्रेश क्रीम, एक छोटा कांदा, दोन पाकळ्या लसूण, एक चमचा बटर, मीठ, काळी मिरी आणि दोन कप पाणी घ्या.

Creamy Coriander Soup | GOOGLE

कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या

सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर तिचे बारीक तुकडे करा. कांदा आणि लसूणदेखील बारीक चिरून घ्या. यामुळे सूप बनवताना सर्व साहित्य व्यवस्थित शिजेल.

Creamy Coriander Soup | GOOGLE

कांदा आणि लसूण परतून घ्या

आता एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यामुळे सूपला छान सुगंध आणि चव येईल.

Kothimbir Cream Soup

कोथिंबीर शिजवून घ्या

आता पॅनमध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. त्यामध्ये थोडे पाणी टाकून दोन ते तीन मिनिटे शिजवा. कोथिंबीर मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

Kothimbir Cream Soup

मिश्रणाची पेस्ट तयार करा

थंड झालेले कोथिंबिरीचे मिश्रण मिक्सरमध्ये घाला. त्याची बारीक पेस्ट तयार करा. सूप अधिक मऊ आणि छान बनवण्यासाठी ही पेस्ट गाळून घेऊ शकता.

Kothimbir Cream Soup

सूपला द्या क्रीमी स्वाद

आता एका पॅनमध्ये तयार केलेली पेस्ट घाला. त्यामध्ये दूध, मीठ आणि काळी मिरी टाकून चांगले मिसळा. मंद आचेवर काही मिनिटे गरम करा. त्यानंतर त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकदा ढवळून घ्या.

Kothimbir Cream Soup

गरमागरम सूप सर्व्ह करा

तयार झालेले कोथिंबीर क्रीम सूप एका बाऊलमध्ये काढा. वरून थोडे फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम सूप ब्रेड क्रुटॉन्स किंवा टोस्टसोबत सर्व्ह करा. तुमचे चविष्ट कोथिंबीर क्रीम सूप तयार आहे.

Kothimbir Cream Soup

Chandrakor Saree Design: लग्नसमारंभात मिळवा रॉयल मराठमोळा लूक! ट्राय करा चंद्रकोर साडीच्या या ७ हटके डिझाइन्स

Chandrakor Saree Design | Saam Tv
येथे क्लिक करा