Shreya Maskar
कर्जत येथे कोथळीगड आहे, ज्याला 'पेठ किल्ला' असेही म्हणतात. हा ३,१०० फूट उंचीचा डोंगरावरील किल्ला आहे.
विरारपासून सुमारे ५० किमी अंतरावर कोथळीगड किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
कोथळीगड त्याच्या नरसाळ्याच्या आकाराच्या अद्वितीय खडकाळ सुळक्यासाठी, आतून कोरलेल्या पायऱ्यांसाठी आणि मोक्याच्या ठिकाणचा टेहळणी बुरूज म्हणून प्रसिद्ध आहे.
कोथळीगड प्रामुख्याने मराठा साम्राज्यासाठी एक मोक्याचा टेहळणी बुरूज आणि दारूगोळा साठवण्याचे ठिकाण म्हणून वापरले जात होता.
१७ व्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचा वापर केला होता.
कोथळीगड किल्ला १३ व्या शतकात भोज वंशाच्या स्थानिक सरदारांनी बांधला होता. इतिहासात या किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे.
मुंबईहून कोथळीगडला जाण्यासाठी रेल्वेने कर्जत स्टेशनला उतरा. पुढे रिक्षा किंवा बसने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबिवली गाव पोहचा. येथून २-३ तासांचा ट्रेक सुरू होतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.