Korlai Fort History: रायगडातील 'या' किल्ल्यावर आहे 'चर्च'; इतिहास माहितीये का?

Dhanshri Shintre

कोर्लई किल्ला

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अलिबाग-मुरुड सीमेवर आणि कुंडलिका नदीच्या खाडीजवळ स्थित कोर्लई किल्ला हा समुद्रकिनारी वसलेला प्राचीन आणि महत्त्वाचा गिरीदुर्ग आहे.

निसर्गसौंदर्याचा सुंदर मिलाफ

पोर्तुगीज वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानला जाणारा हा किल्ला, हिरवाईने नटलेल्या परिसरात इतिहासाची झलक आणि निसर्गसौंदर्याचा सुंदर मिलाफ दाखवतो.

पोर्तुगीज राजवट

या किल्ल्याचे बांधकाम पोर्तुगीजांनी अहमदनगर सल्तनतेच्या परवानगीने १५२१ मध्ये सुरू केले आणि सुमारे १६५० पर्यंत टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करण्यात आले.

उद्देश

या किल्ल्याचा प्रमुख हेतू कुंडलिका खाडीच्या प्रवेशद्वारावर नजर ठेवून, या परिसरातील समुद्री मार्ग आणि व्यापारावर प्रभावी नियंत्रण ठेवणे असा होता.

मराठा ताबा

छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश मिळाले नाही. अखेर १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी मराठ्यांच्या वतीने हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला.

भौगोलिक रचना

हा किल्ला सुमारे ९०० मीटर लांबीचा आणि २७ मीटर रुंदीचा आहे. अरूंद डोंगररांगेवर वसलेल्या या दुर्गाच्या एका बाजूला जंगल, तर दुसरीकडे उघडा मोकळा परिसर आहे.

वास्तुकला

या किल्ल्यात एकूण ११ प्रवेशद्वारे असून मराठाकाळात काही बुरुजांना ‘पुसती’, ‘गणेश’, ‘पश्चिम देवी’, ‘चौबुरजी’, ‘राम’ आणि ‘पान’ अशी नावे देण्यात आली होती.

धार्मिक स्थळे

महाराष्ट्रातील चर्च असलेला हा एकमेव किल्ला मानला जातो. येथे पाण्याची टाकी आणि इतर ऐतिहासिक बांधकामांचे अवशेषही पाहायला मिळतात.

स्थान

हा ऐतिहासिक किल्ला अलिबागपासून साधारण २०-२२ किलोमीटर आणि रेवदंडा गावापासून जवळपास ८ किलोमीटर अंतरावर स्थित आहे, त्यामुळे पोहोचणे सहज शक्य होते.

NEXT: मुंबईतील 'या' किल्ल्याला लाभलाय ऐतिहासिक वारसा; एकदा आवर्जून भेट द्याच

येथे क्लिक करा