Shruti Vilas Kadam
ही जगभर गाजलेली सिरीज आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांची कथा सांगते. जीवघेण्या खेळांमधून विजेता ठरण्यासाठी स्पर्धकांना संघर्ष करावा लागतो. थरारक कथानकामुळे ही सिरीज प्रचंड लोकप्रिय ठरली.
दक्षिण कोरियातील एक श्रीमंत उद्योजिका अपघाताने उत्तर कोरियात पोहोचते आणि तेथे एका सैनिकाच्या प्रेमात पडते. रोमांस आणि भावनिक प्रसंगांनी भरलेली ही सिरीज प्रेक्षकांची आवडती आहे.
शाळेत अचानक झॉम्बी व्हायरसचा प्रादुर्भाव होतो आणि विद्यार्थ्यांच्या जगण्यासाठीच्या संघर्षाची कथा या सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. हॉरर आणि थरार आवडणाऱ्यांसाठी ही उत्तम निवड आहे.
इटलीत वाढलेला कोरियन माफिया वकील आपल्या देशात परततो आणि भ्रष्ट लोकांविरुद्ध लढा देतो. अॅक्शन, विनोद आणि ड्रामाचा उत्कृष्ट संगम या सिरीजमध्ये पाहायला मिळतो.
एका मुलीने मैत्रिणीच्या जागी ब्लाइंड डेटला जाण्याचा घेतलेला निर्णय तिच्या आयुष्यात मोठे वळण आणतो. हलक्याफुलक्या रोमँटिक कथांसाठी ही सिरीज प्रसिद्ध आहे.
शालेय जीवनात झालेल्या छळाचा बदला घेण्यासाठी एका महिलेने आखलेल्या योजनांची ही कथा आहे. दमदार अभिनय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे ही सिरीज विशेष गाजली.
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित ही सिरीज राजकारण, सत्तासंघर्ष आणि झॉम्बी संकट यांचे अनोखे मिश्रण सादर करते. वेगळा अनुभव देणारी ही सिरीज नक्की पाहण्यासारखी आहे.