Manasvi Choudhary
आजकाल कोरियन स्किनकेअरचा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळतो. ग्लोईंग स्किनटोनसाठी अनेक महिला व मुली कोरियन स्किनकेअर रूटीन फॉलो करतात.
कोरियन स्किनकेअर केल्याने त्वचा काचेसारखी चमकदार आणि छिद्रविरहित दिसते असे वाटते मात्र भारतीय त्वचेवर कोरियन स्किनकेअर सूट होत नाही. त्याचे दुष्परिणाम दिसतात.
इंडियन स्किन टोन लाईट आणि डार्क असतो. त्वचेमध्ये 'मेलॅनिन' नावाचे रंगद्रव्य असते. जे उन्हापासून वाचवते. ज्यामुळे त्वचा जळत नाही तर काळी पडते
कोरियामध्ये वर्षभर थंड आणि कोरडे हवामान असते. त्यामुळे कोरियन स्किनकेअर उत्पादने त्वचेला अति-हायड्रेट आणि तेलकट बनवण्यासाठी वापरतात. याउलट, भारतातील हवामान उष्ण आणि दमट असते. अशा वातावरणात जड कोरियन क्रीम्स लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात आणि चेहऱ्यावर प्रचंड घाम व तेल साचते.
भारतातील दमट हवेत कोरियन स्किनकेअर उत्पादने लावल्याने छिद्रे बंद होऊन चेहऱ्यावर पिंपल्स, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सचा येऊ शकतात.
कोरियन उत्पादनांमध्ये राईस वॉटर किंवा विशिष्ट प्रकारची केमिकल्स असतात. ज्यामुळे त्वचा लाल होणे, खाज सुटण्याचा धोका असतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.