Shreya Maskar
कोरियन फेस क्रीम बनवण्यासाठी तांदूळ, कोरफडी जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल लागेल. ही क्रीम तुम्ही रात्री चेहऱ्याला लावून झोपा.
कोरियन फेस क्रीम बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवा. ४-५ वेळा धुवा. जेणेकरून त्यातील केमिकल्स नघून जातील. चेहऱ्याला कोणताही संसर्ग होणार नाही.
तांदळामध्ये अमिनो ॲसिड, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे तुमची त्वचा उजळवण्यास मदत करतात. त्यामुळे काळवंडलेल्या त्वचेवर ही क्रीम नक्की लावा.
तांदूळ दुधाळ रंगाचा झाला की तो मिक्सरमध्ये वाटून घ्या. तांदळाचे उरलेले पाणी स्प्रे बाटलमध्ये साठवून त्याचा टोनर म्हणून वापरा. ज्यामुळे त्वचा मुलायम बनते.
कोरियन फेस क्रीम बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये तांदळाची पेस्ट, तांदळाचे पाणी, कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, नारळाचे तेल मिक्स करा. चांगली फेटून घ्या.
रात्री झोपण्यापूर्वी हे क्रीम स्वच्छ चेहऱ्यावर लावा. आधी चेहरा फेसवॉशने धुवून चांगला कोरडा करा आणि त्यानंतर तयार क्रीम चेहऱ्यावर लावून झोपा. सकाळी उठल्यावर चेहरा पुन्हा एकदा फेसवॉशने धुवा.
तयार टोनर आणि फेस क्रीम जास्तीत जास्त १ आठवडा हवा बंद डब्यात चांगली राहू शकते. त्यानंतर ती पुन्हा बनवा. ही क्रीम तुम्ही रोज झोपताना चेहऱ्यावर लावा.
घरगुती उपाय कितीही नैसर्गिक असले तरी पॅच टेस्ट करा आणि मगच चेहऱ्यावर लावा. जेणेकरून कोणतीही समस्या येणार नाही.