Manasvi Choudhary
कोरियन स्किनकेअर रूटीन सध्या जगभरात ट्रेंडमध्ये आहे. कोरियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य म्हणजे पातळ, नितळ त्वचा.
कोरियन मुलींचा चेहरा कायम चमकदार कशी राहते यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
कोरियन त्वचेसाठी चेहऱ्याची काळजी नियमितपणे घेणे महत्वाचे आहे. खालील स्टेप्स नियमितपणे न चुकता फॉलो करा.
कोरियन स्किनकेअरची सुरूवात डबल क्लिजिंगने करा यासाठी तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
त्वचा गुळगुळीत व्हावी यासाठी तुम्ही त्वचेला टोनर लावणे महत्वाचे आहे. तांदूळ भिजवलेले पाणी चेहऱ्यावर टोनर म्हणून वापरा यामुळे त्वचा गुळगुळीत होऊन चमकू लागेल.Korean Skincare Routine
सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचा काळी दिसते. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर spf30+ असलेली सनस्क्रिन लावा यामुळे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून रक्षण होते.
त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी मध आणि साखरेचा स्क्रब करा. यामुळे त्वचेवरील काळे डाग, निस्तेजा त्वचा कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेचे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याने भिजवलेला कपडा ठेवा. यामुळे त्वचेवरील कोरडेपणी कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.