Shruti Vilas Kadam
तांदूळ धुतल्यानंतर उरलेले पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा किंवा त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळून मास्क तयार करा. यामुळे त्वचा उजळते आणि पोअर्स टाईट होतात.
ग्रीन टी थंड करून त्यात मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा मास्क पिंपल्स कमी करतो आणि त्वचेला शांतता देतो.
मध आणि कच्चे दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि ग्लोइंग होते.
ताजं अॅलोवेरा जेल थेट चेहऱ्यावर लावा. हा मास्क त्वचेला थंडावा देतो आणि डाग कमी करण्यास मदत करतो.
ओट्स पावडर आणि दही मिसळून मास्क तयार करा. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचा स्मूथ होते.
अंड्याचा पांढरा भाग फेटून चेहऱ्यावर लावा. यामुळे पोअर्स घट्ट होतात आणि त्वचेला लिफ्टिंग इफेक्ट मिळतो.
काकडीचा रस किंवा पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा मास्क त्वचेला फ्रेश ठेवतो आणि सूज, काळी वर्तुळे कमी करतो.