Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हे कर्ली नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे कोकणातील सुंदर पिकनिक स्पॉट आहे.
कुडाळ येथे प्राचीन मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात. परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. यात कुडाळमध्ये श्री देवी केळबाई मंदिर आणि श्री कुडाळेश्वर मंदिर आहे. कविलगाव येथील साई मंदिर यांचा समावेश आहे.
कुडाळ मधील निळेशार समुद्रकिनारे आहेत. यात निवती, भोगवे, खवणे, तळाशील, तोंडवली यांचा समावेश आहे. हे किनारे स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य असून स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. तसेच जवळ तारकर्ली बीच देखील आहे.
कुडाळ येथे प्रसिद्ध ऐतिहासिक 'निवतीचा किल्ला' आणि 'सिंधुदुर्ग' किल्ला आहे. येथे तुम्हाला इतिहासाचे दर्शन घडते.
कुडाळ-मालवण मार्गावर प्रसिद्ध धामापूर तलाव आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. एकदा कोकण ट्रिप नक्की प्लान करा.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कुडाळला भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करा. तसेच येथील बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.