Fort Trek : घनदाट जंगल अन् ट्रेकिंगचा थरार! कोल्हापूरचा 'हा' किल्ला तुमच्या बकेट लिस्टमध्ये हवाच

Shreya Maskar

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर रंगणा किल्ला वसलेला आहे. हा ऐतिहासिक डोंगरावरील किल्ला आहे. तुम्हाला येथे पावसाळ्यात ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.

Kolhapur and Sindhudurg | google

रंगणा किल्ला

रंगणा किल्ला घनदाट जंगलातून जाणाऱ्या ट्रेकसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा इतिहासातील त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे अत्यंत प्रसिद्ध आहे.

Rangana Fort | google

किल्ल्याचा उद्देश

रंगणा किल्ला शिलाहार राजवटीने १२ व्या शतकात बांधला होता. कोकण किनारपट्टी आणि दक्षिण कोल्हापूरच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी याचा वापर केला होता.

The purpose of the fort | google

किल्ला कोणी बांधला?

शिलाहार राजवटीतील राजा भोज (दुसरा) याने रंगणा किल्ला बांधला. याचे बांधकाम इसवी सन ११८७ मध्ये झाले. रंगणा किल्ल्याला 'प्रसिद्धगड' असेही म्हणतात.

Who built the fort? | google

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये आदिलशाही राजवटीकडून रंगणा किल्ला जिंकून घेतला. त्यांनी त्याचे नाव बदलून 'प्रसिद्धगड' असे ठेवले आणि मराठा साम्राज्याच्या दक्षिण सीमांच्या संरक्षणासाठी त्याची डागडुजी केली. रायगड, कोकण आणि कर्नाटक यांच्या दरम्यान प्रवास करताना शिवाजी महाराज या किल्ल्याचा तळ म्हणून वापर करत होते.

History | google

किल्ल्याची रचना

रंगणा किल्ल्याचा आकार नैसर्गिकरीत्या खडकाळ आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगेच्या नैसर्गिक रचनेनुसार वसलेला आहे. किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार अर्धवर्तुळाकार असल्यामुळे प्रसिद्ध आहे.

Fort structure | google

ट्रेकिंगचा थरार

२,६०० फूट उंचीवर असलेला रंगणा किल्ल्याचा ट्रेक जगात भारी आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही येथे ट्रेकिंगचा थरार पाहायला मिळतो.

trekking | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : देवगडमध्ये लपलाय अरबी समुद्रावर नजर ठेवणारा भव्य किल्ला, जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास

Devgad | AI PHOTO
येथे क्लिक करा...