Devgad : देवगडमध्ये लपलाय अरबी समुद्रावर नजर ठेवणारा भव्य किल्ला, जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे देवगड किल्ला वसलेला आहे. जिथे देवगड खाडी अरबी समुद्राला मिळते, अशा एका खडकाळ कड्यावर हा किल्ला वसलेला आहे.

Sindhudurg | google

देवगड किल्ला

देवगड किल्ला 'जंजिरा देवगड किल्ला' म्हणूनही ओळखला जातो. देवगड किल्ला अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यांसाठी आणि १९१५ मधील ऐतिहासिक दीपगृहासाठी (लाईटहाऊस) प्रसिद्ध आहे.

Devgad Fort | google

सागरी किल्ला

देवगड किल्ला १८ व्या शतकातील सागरी किल्ला आहे. येथे प्राचीन गणेश मंदिर देखील आहे.तसेच कोकण किनारपट्टीवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा दिसतो.

Sea fort | google

किल्ला कोणी बांधला?

देवगड किल्ला १७२९ मध्ये मराठा नौदल प्रमुख दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला होता.सागरी देखरेख केंद्र आणि नौदल तळ म्हणून याचा वापर केला जात असे. तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला हा किल्ला सागरी व्यापार मार्गांचे रक्षण करायचा.

Who built the fort? | google

किल्ल्याचा आकार

देवगड किल्ला जमिनीच्या एका अरुंद पट्ट्यावर वसलेला आहे. याचा आकार त्रिकोणासारखा आहे. हा किल्ला एका उंच खडकाळ कड्यावर आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंना पाणी आहे. यामुळे मराठा नौदल तळासाठी एक नैसर्गिक जल-संरक्षक कवच तयार झाले आहे.

The size of the fort | google

इतिहास

देवगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी रणनीतीला बळकटी देण्यासाठी बांधला गेला होता. शत्रूची जहाजे ओळखण्यासाठी देवगड हे एक महत्त्वपूर्ण मराठा नौदल तळ म्हणून कार्यरत होते.

History | google

कसं जाल?

देवगड किल्ल्याजवळ कणकवली हे स्टेशन आहे. तुम्ही मुंबईहून कणकवलीपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रिक्षा किंवा बसने तुम्ही देवगड किल्ल्यापर्यंत पोहचाल.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : २ नद्यांच्या संगमावर उभा असलेला ऐतिहासिक किल्ला, आयुष्यात एकदा तरी पाहा सुंदर नजारा

Akola Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...