Shreya Maskar
कणकवलीजवळ ऐतिहासिक 'रामगड किल्ला' आहे. हा किल्ला कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात , मालवण तालुक्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किनारपट्टीवरील संरक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी किल्ल्याची उभारणी करण्यात आली.
मराठा साम्राज्याची नदीमार्गे होणारी रसद पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यात, अंतर्गत धोक्यांपासून संरक्षण करण्यात आणि या भागातील व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यात या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
किल्ल्याला पश्चिमाभिमुख ८ फूट उंच प्रवेशद्वार आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना १८ फूट उंच बुरूज आहेत. तसेच, येथे काळ्या पाषाणात कोरलेली प्राचीन गणेशमूर्ती आणि शत्रूपासून बचावासाठी एक गुप्त मार्ग देखील आहे.
रामगड किल्ल्याच्या आत पर्यटकांना जमिनीखाली उलटी गाडलेली सात ऐतिहासिक तोफांची रचना पाहायला मिळते.
रामगड किल्ला हा गड नदीच्या काठावर २१० फूट उंच टेकडीवर बांधलेला आहे. मराठा काळात, किनारपट्टीच्या मार्गावरून अन्नधान्य, तोफखाना आणि सैनिकांचा पुरवठा करण्यासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र होते.
रामगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई ते कणकवली ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर कणकवली स्टेशनला उतरल्यावर रिक्षा किंवा एसटीने किल्ल्याच्या पायथ्याशी जा. पायथ्याशीच्या गावापासून २० मिनिटांचा ट्रेक करावा लागतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.