Shreya Maskar
दापोली हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले सुंदर ठिकाण आहे. दापोली कोकणची शान आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या.
मुरुड समुद्रकिनारा हा दापोली परिसरातील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथील विस्तीर्ण वाळू, नारळाची झाडे आणि अथांग समुद्र पर्यटकांना आकर्षित करतात. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, सूर्यास्त पाहण्यासाठी येथे नक्की जा.
सुवर्णदुर्ग किल्ला हा हर्णै किनाऱ्याजवळ समुद्रात असलेला ऐतिहासिक जलदुर्ग आहे. मराठा आरमाराच्या इतिहासात या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आणि समुद्रातील त्याचे स्थान इतिहासप्रेमींना आकर्षित करतात.
कड्यावरचा गणपती मंदिर हे आंजर्ले गावातील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. उंच ठिकाणी वसलेले हे मंदिर आणि आजूबाजूचा निसर्ग पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
पन्हाळेकाजी लेणी हा दापोली परिसरातील इतिहासप्रेमींसाठी महत्त्वाचा वारसास्थळ समूह आहे. कोटजाई नदीच्या परिसरात असलेल्या या लेण्यांमध्ये प्राचीन काळातील शिल्पकला, धार्मिक प्रतिमा आणि दगडात कोरलेल्या वास्तू पाहायला मिळतात.
दापोली परिसरातील उन्हवरे गावातील नैसर्गिक गरम पाण्याचे झरे हे वेगळ्या प्रकारचे पर्यटनस्थळ आहे. जमिनीखालून येणाऱ्या गरम पाण्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.
लाडघर समुद्रकिनारा दापोली परिसरातील सुंदर पर्यटन स्थळ आहे. काही वेळा समुद्राच्या पाण्याला दिसणाऱ्या लालसर छटेमुळे या किनाऱ्याला 'तामसतीर्थ' असेही म्हटले जाते. समुद्राच्या लाटा, मावळतीचा सूर्य आणि किनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांना आवडते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.