Shreya Maskar
कोळाचे पोहे बनवण्यासाठी पोहे, चिंच, गूळ, नारळाचे दूध, पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर, मोहरी, मीठ आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.
कोळाचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम चिंच आणि गूळ एका बाऊलमध्ये पाणी टाकून भिजत ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे आणि दुधाचे वाटण बनवून घ्या.
दुसरीकडे नारळाच्या दुधात पोहे भिजत ठेवा.
त्यानंतर नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ आणि खोबऱ्याचे मिश्रण मिक्स करा.
या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून एकत्र करा.
फोडणीसाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता घालून मिक्स करा.
तयार फोडणी पोह्यांच्या मिश्रणावर टाका आणि आंबटगोड कोळाचे पोह्यांचा आस्वाद घ्या.