Shreya Maskar
घावणे पचायला हलके असतात, त्यामुळे पावसाळ्यात नाश्त्यासाठी हा हेल्दी पदार्थ आहे. तसेच बनवायला देखील सोपा आहे.
कोकण स्पेशल घावणे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, मीठ, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
घावणे बनवण्यासाठी सर्वप्रथन तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळ मिक्सरला वाटून त्याची पेस्ट बनवा.
एका मोठ्या बाऊलमध्ये तांदळाचे पीठ टाकून चवीनुसार मीठ मिक्स करा. गरजेनुसार हळूहळू पाणी टाका. घावण्याची पीठ किंचित पातळ पीठ तयार करायचे.
तयार पीठ झाकून १-२ तास बाजूला ठेवून द्या, म्हणजे पीठ फुलते आणि घावण्याची चव वाढते.
आता गॅसवर कमी आचेवर तवा गरम करा. यात थोडे तेल पसरवून घ्या. पळीभर घावण्याचे पीठ तव्यावर टाकून चांगले गोल पसरवून घ्या आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
पीठ तव्यावर ओतण्याआधी व्यवस्थित ढवळून घ्या. घावणे दोन्ही बाजूने खरपूस भाजा.
तयार घावणे तुम्ही लसूण चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. कोकणात हा पदार्थ सकाळच्या नाश्त्याला गरमागरम चहासोबत खाल्ला जातो.