Ratnagiri Fort : कोकण ट्रिपचा प्लान करताय? मग रत्नागिरीतील 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहायला अजिबात विसरू नका!

Shreya Maskar

रत्नागिरी

महिपतगड हा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील खेडपासून सुमारे २३ किमी अंतरावर असलेला एक विशाल आणि ऐतिहासिक गिरीदुर्ग (डोंगरावरील किल्ला) आहे.

Ratnagiri | google

महिपतगड किल्ला

महिपतगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २,९६० फूट उंचीवर वसलेला आहे. तसेच १२० ते २०० एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. हा किल्ला घनदाट जंगले, प्राचीन प्रवेशद्वारे आणि आदिलशाही व मराठा काळातील ऐतिहासिक अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.

Mahipatgarh Fort | google

इतिहास

मूळतः १५ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही राजवटीने बांधलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६६०-१६६१ च्या सुमारास यशस्वीपणे जिंकून घेतला, ज्यामुळे त्यांना या भागातील महत्त्वाच्या लष्करी मार्गांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

History | google

कसं जाल?

महिपतगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबईहून खेडापर्यंत ट्रेनने प्रवास करा. खेड स्टेशनला उतरल्यावर रिक्षा किंवा एसटीने किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावाजवळ (वाडी बेलदार) पोहचा.

how do you go | google

जवळचे किल्ले

महिपतगड किल्ल्याजवळ सुमारगड आणि रसाळगड हे किल्ले आहेत. हे तिन्ही किल्ले ट्रेकिंगचा बेस्ट ऑप्शन आहे. येथील पठार इतके मोठे आहे की, दोन मोठ्या विहिरी, वापरले न गेलेले तोफगोळे (मोर्टार) आणि जुन्या घोड्यांच्या पागांचे अवशेष आढळतात.

Nearby forts | google

सहा प्रवेशद्वारे

येथे सहा प्रवेशद्वारे आहेत जी आज काहीशी पडक्या अवस्थेत असली तरी ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत आकर्षक आहेत. त्यांची नावे लालदेवडी, पुसाती, यशवंत, खेड, कोतवाल आणि शिवगंगा अशी आहेत.

Through six entries | google

निसर्ग सौंदर्य

शिवगंगा दरवाजाजवळ तुम्हाला खडकात कोरलेले प्राचीन शिवलिंग आणि मारुतीचे एक जीर्ण मंदिर पाहायला मिळेल.किल्ल्याच्या मोक्याच्या स्थानामुळे सह्याद्रीच्या रांगांमधील हिमालयासारखी उंच शिखरे, मकरंदगड, महाबळेश्वर आणि जगबुडी नदीचे खोरे यांचे विहंगम दृश्य दिसते.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

Nashik Fort | saam tv
येथे क्लिक करा...