Shreya Maskar
कोकणात निसर्गाची विविध रूप पाहायला मिळतात.
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना अनुभवायचा असेल तर कोकणाला आवर्जून भेट द्या.
कोकणात असे मंदिर आहे की, जे फक्त एका दगडावर उभे आहे.
लोटेश्वर मंदिर साधारणपणे 30 फूट उंच आणि 25 फूट घेर असलेल्या दगडावर उभे आहे.
या मंदिराचे वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते.
रत्नागिरी जवळ असलेल्या डुगवे गावात हे स्वयंभू मंदिर आहे.
या मंदिराच्या पायथ्याशी असलेला पाण्याचा ओढा बारा महिने प्रवाहित असतो.
लोटेश्वर मंदिराच्या आजूबाजूला घनदाट जंगल पाहायला मिळते.
भाविकांना मंदिरात जाण्यासाठी जिना पद्धतीत छोटा पूल बनवला आहे.