Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावाजवळ मुणगे बीच हा शांत आणि तुलनेने कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. मुणगे बीच कोकणातील हिडन लोकेशन आहे.
निळाशार समुद्र, हिरवीगार डोंगररांग, नारळ-पोफळीच्या बागा, आंब्याची झाडे आणि कोकणी गावजीवन यांच्यासाठी मुणगेचा परिसर प्रसिद्ध आहे.
सूर्योदय - सूर्यास्ताचे फोटो काढणे, समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, निवांत वेळ घालवणे आणि कोकणातील पारंपरिक ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो.
मुणगे बीचला ताजे मासे, सोलकढी, भाकरी, घावण, नारळावर आधारित पदार्थ आणि कोकणी पद्धतीचे जेवण चाखता येते.
ऑक्टोबर ते मार्च हा सिंधुदुर्ग किनारपट्टी फिरण्यासाठी साधारणतः सुखद काळ मानला जातो. पावसाळ्यात मुणगे आणि संपूर्ण कोकण परिसर हिरवागार आणि अत्यंत सुंदर दिसतो.
मुणगे बीचला जाण्यासाठी कणकवली हे जवळचे स्टेशन आहे. पुढे मुणगे गावातून समुद्रकिनाऱ्याकडे स्थानिक रस्त्याने रिक्षाने जाता येते.
कुणकेश्वर मंदिर , देवगड किल्ला , सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच आणि विजयदुर्ग किल्ला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.