Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Shreya Maskar

बुलढाणा

लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहराजवळ असलेले जगप्रसिद्ध नैसर्गिक आश्चर्य आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहायला परदेशी पर्यटकही गर्दी करतात.

Buldhana | google

लोणार सरोवर

उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवराला भूगर्भशास्त्रीय, पर्यावरणीय आणि ऐतिहासिक असे तिन्ही महत्त्व आहे. लोणार सरोवरातील पाणी खारट आणि अल्कधर्मी स्वरूपाचे आहे.

Lonar Lake | google

हिरवागार निसर्ग

सरोवराच्या भोवती हिरवाई, वनक्षेत्र आणि विविध प्रकारचे पक्षी-प्राणी आढळतात. या परिसराला लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाते. परिसरात मोर, पोपट यांसारखे पक्षी तसेच विविध वन्यजीव पाहायला मिळतात.

Green nature | google

प्राचीन मंदिरे

परिसरात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. यात दैत्यसूदन मंदिर, कमळजा देवी मंदिर, मोथा मारुती मंदिर अशा अनेक प्राचीन मंदिरांचा समावेश आहे.

Ancient temples | google

कधी भेट द्यावी?

ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी तुम्ही लोणारला भेट देऊ शकता, त्यामुळे हिवाळ्यात कुटुंबासोबत येथे वन डे ट्रिप नक्की प्लान करा. निसर्गाचा अद्भूत चमत्कार पाहा.

When to visit? | google

व्ह्यूपॉइंट

सरोवराच्या काठावरून खाली पसरलेले संपूर्ण क्रेटर पाहणे हा लोणार भेटीतील खास अनुभव आहे. वरून सरोवराचा गोलाकार आकार, सभोवतालची झाडी आणि विवराची भौगोलिक रचना स्पष्टपणे दिसते.

Viewpoint | google

ट्रेकिंग करताना काळजी

सरोवराच्या विवरात उतरण्यासाठी काही ठिकाणी उताराचा मार्ग आहे. त्यामुळे ग्रिप असलेले ट्रेकिंग शूज, पुरेसे पाणी आणि आवश्यक संरक्षण साहित्य सोबत ठेवणे योग्य आहे. पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

trekking | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

Sambhajinagar | AI PHOTO
येथे क्लिक करा...