Konkan Ghats : धुक्यात हरवलेले कोकणातील ५ वळणावळणाचे घाट, रोड ट्रिप करताना येईल मोहक अनुभव

Shreya Maskar

कोकण घाट

कोकणातील किंवा कोकणाला जोडणारे घाट मार्गाने तुम्ही मित्रांसोबत भन्नाट रोड ट्रिप प्लान करू शकता. कोकण प्रदेशाजवळील घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ते किनारपट्टीवरील मैदानी प्रदेशाला दख्खनच्या पठाराशी जोडतात. हे घाट ऐतिहासिक व्यापाराचे महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून कार्य करतात.

Konkan Ghats | google

आंबोली घाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाट आहे. "महाराष्ट्राचे चेरापुंजी" म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.हा संपूर्ण परिसर हिरव्यागार वनराईने आच्छादलेला असून, येथे अनेक धबधबे पाहायला मिळतात.

Amboli Ghat | google

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट पुणे - कोकण मार्गाला जोडतो. दख्खनच्या पठाराला कोकण पट्ट्याशी जोडणारा एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. असंख्य धबधबे, धुक्यात हरवलेले डोंगर आणि घनदाट अरण्ये यासाठी हा घाट विशेष प्रसिद्ध आहे.

Tamhini Ghat | google

वरंधा घाट

वरंधा घाट हा प्रामुख्याने पुणे जिल्ह्याला (भोर) रायगड जिल्ह्याशी (महाड) जोडणारा एक प्रमुख आणि निसर्गरम्य घाटमार्ग आहे. खोल आणि हिरव्यागार दऱ्या, उभे कडे आणि धुक्याची चादर, खडबडीत प्रदेश येथे पाहायला मिळतो.

Varandha Ghat | google

कुंभारली घाट

कुंभारली घाट हा सातारा ते रत्नागिरी (चिपळूण) या मार्गाला जोडतो. सुंदर रस्ते आणि दुतर्फा अरण्ये असलेला हा मार्ग आहे. इतर काही तीव्र चढणीच्या घाटांच्या तुलनेत अधिक सुखद प्रवासाचा अनुभव देतो.

Kumbharli Ghat | google

आंबा घाट

आंबा घाट हा सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो कोकणाला (रत्नागिरी जिल्हा) पश्चिम महाराष्ट्राशी (कोल्हापूर जिल्हा) जोडतो. घनदाट अरण्ये आणि चढ-उताराच्या टेकड्यांनी वेढलेला, जैवविविधतेने समृद्ध असा हा एक अप्रतिम घाट आहे.

Amba Ghat | google

कधी जावे?

तुम्ही कधीही या घाट मार्गाने प्रवास करू शकता. पण तुम्हाला निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे आवर्जून फिरायला जा.

When to Visit? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सह्याद्रीतील लोखंडी किल्ला! लोहगड किल्ल्याच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितेय का?

Lohagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...