Shreya Maskar
कोकण हे पर्यटनाचे केंद्र बिंदू आहे.
पावसाळ्यात आणि मे महिन्यात पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
कोकणला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे.
कोकणातील जेवणाच्या चवीला कशाची तोड नाही.
गेल्या काही वर्षापासून परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणला भेट देतात, त्यामुळे येथे पर्यटन व्यवसायाची भरभराट झाली आहे.
सर्व सुविधा असलेले आणि कमी पैशांत हॉटेल्स येथे पाहायला मिळतात.
समुद्रकिनाऱ्यासोबतच येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक देव दर्शन करण्यासाठी येतात.
कोकणात अनेक बागा, धबधबे, तलाव, खोल दऱ्या आणि डोंगराळ भाग अनुभवायला मिळतो.