Dhanshri Shintre
रत्नागिरी- काश्मीर खोऱ्यात पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यानंतर कोकण किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे.
पोलिसांकडून किनारपट्टी भागात डोळ्यात तेल घालून गस्त घालण्यात येतंय.
समुद्र किनारी आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच किनारपट्टी भागात चेकपोस्ट, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी किनाऱ्यावर 24 तास गस्त, पर्यटन स्थळांवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
किनारपट्टी भागात लँडिंग पॉईंटवर विशेष नजर, रत्नागिरी जिल्ह्यात 36 लॅडिंग पॉईंट आहेत.