Shreya Maskar
कोंडुरा बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात, वेंगुर्ला तालुक्यात वसलेला आहे.
कोंडुरा बीच कोकण किनारपट्टीवरील एक शांत आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा बीच त्याच्या पांढऱ्या आणि रेशमी वाळूसाठी ओळखला जातो
ज्येष्ठ साहित्यिक चिं. त्र्य. खानोलकर यांनी त्यांच्या 'कोंडुरा' या कादंबरीत कोकणातील कोंडुरा समुद्रकिनाऱ्याचे रहस्यमय वर्णन केले आहे.
कोंडुरा बीच वरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे परदेशी पर्यटकही येतात.
समुद्रकिनाऱ्यावर भन्नाट फोटोशूट करण्यासाठी तुम्ही आवर्जू कोंडुरा बीचला भेट द्या.
कोंडुरा बीचवर बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
कोंडुरा बीचच्या परिसरात हिरवीगार वनराई पाहायला मिळते.