Tanvi Pol
ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे शहर गेल्या काही वर्षांपासून विविध घटनांमुळे प्रसिद्ध झाले आहे.
कल्याण शहराला ऐतिहासिकही वारसा लाभलेला आहे.
कल्याण शहराचे नाव घेताच कोळशेवाडी या परिसराची चर्चा आपोआप होण्यास सुरुवात होते.
पण कोळशेवाडी या नावाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
कल्याण पूर्वेचा भाग असलेल्या कोळशेवाडीत पूर्वी विटभट्ट्या होत्या.
तिथे मोठ्या प्रमाणात कोळसा पेटत असे आणि त्यावर रेल्वे धावल्या जायच्या.
हळूहळू त्या भागात वस्ती वाढली आणि नाव पडले कोळशेवाडी.