Manasvi Choudhary
कोल्हापूरी ठेचा जेवताना तोंडी लावण्यासाठी खास बनवला जातो.
घरी स्पेशल कोल्हापूरी ठेचा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कोल्हापूरी ठेचा बनवण्यासाठी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जीरे, मीठ आण तेल हे साहित्य घ्या
सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्या. भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काढा.
आता गॅसवर तव्यामध्ये हिरवी मिरची जीरे लसूण घालून परतून घ्या.
मिरची भाजत आल्यावर त्यात शेंगदाणे घालून थोडे परतून घ्या आणि वरतून मीठ घाला.
आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी कोल्हापुरी मिरची ठेचा तयार आहे.