Idli Sambar Recipe: इडली सांबर घरी बनवण्याची सोपी पद्धत, रेसिपी महिलांनी लिहून ठेवा

Manasvi Choudhary

इडली सांबर

नाश्त्याला पौष्टिक इडली, सांबर खायला सर्वांनाच आवडते.

Idli Sambar Recipe

सोपी रेसिपी

इडली सांबर घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

साहित्य

इडली सांबर बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, पोहे, मेथी, मीठ, तुरडाळ, कांदा, टोमॅटो, गाजर, वांगी, लाल भोपळा, सांबर मसाला, हळद, मोहरी, लाल मिरच्या, कडीपत्ता, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य घ्या.

Idli Sambar Recipe

तांदूळ भिजत घाला

सर्वप्रथम एका भांड्यात इडली बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, पोहे आणि मेथीदाणे स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजत घाला.

Idli Sambar Recipe | SAAM TV

मिश्रण

भिजत घातलेलं सर्व मिश्रण एकत्र बारीक वाटून घ्या. यानंतर मीठ घालून काही वेळ हे मिश्रण आंबवून घ्या.

Idli Sambar Recipe | yandex

पीठ

नंतर इडली बनवण्याच्या भांड्याला तेल लावा यानंतर त्यामध्ये आंबवलेलं इडली पीठ छान घाला आणि छान शिजवून घ्या.

Idli Sambar Recipe | saam tv

सांबर

सांबर बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून घ्या. गॅसवर कुकरमध्ये तुरीच्या डाळीमध्ये हळद, मीठ आणि पाणी घालून चांगली शिजवून घ्या.

Idli Sambar Recipe | saam tv

भाज्या शिजवून घ्या

यानंतर शिजलेल्या डाळीमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल भोपळा, गाजर, वांगी घालून थोडे पाणी घालून शिजवून घ्या.

Idli Sambar Recipe | Saam TV

फोडणी घाला

फोडणी देताना कढईत गरम तेलामध्ये मोहरी, कडीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून परतून घ्या.

Idli Sambar Recipe | yandex

मीठ घाला

अशाप्रकारे डाळीच्या मिश्रणात ही फोडणी मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला.

Idli Sambar Recipe | google

सांबर

सर्व्हसाठी गरमागरम सांबर तयार आहे.

Idli Sambar Recipe | yandex

NEXT: Turmeric Milk: कोजागिरीलाच नाही तर नियमित प्या हळदीचं दूध, होतील भन्नाट फायदे

येथे क्लिक करा...