Sakshi Sunil Jadhav
कोल्हापूरची ओळख ठरलेली कोल्हापुरी चप्पल आज फक्त पायात घालण्याची वस्तू न राहता प्रतिष्ठा, रुबाब आणि भारतीय हस्तकलेचे जागतिक प्रतीक बनली आहे.
जगप्रसिद्ध 'प्राडा' हा ब्रॅंड आणि कोल्हापुरी चप्पल वाद याआधी संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला होता. काहीशे रुपयांत तयार होणाऱ्या चपलेला ब्रँड टॅग लावून लाखोंना विकले जात असल्याने संताप व्यक्त झाला होता.
आता कोल्हापुरात तयार झालेली एक खास कोल्हापुरी चप्पल थेट इटलीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा कोल्हापुरी हस्तकलेची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध कारागीर राजेंद्र शिंदे यांनी तयार केली असून ती नेहमीच्या कोल्हापुरी चपलांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि आगळीवेगळी आहे.
या चपलेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही चपलांचे वजन अगदी समान आणि फक्त 121 ग्रॅम, एक-दोन ग्रॅमचाही फरक नसलेली अचूकता कारागिरीचे कौशल्य दाखवते.
चपलेवर केलेली अत्यंत सूक्ष्म, नाजूक आणि देखणी डिजाईन ही पारंपरिक कोल्हापुरी नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना मानली जात आहे.
इटलीतील ग्राहकांना ऑर्डर देताना अशी चप्पल याआधी कुणीही बनवलेली नसावी अशी अट घातल्याने राजेंद्र शिंदे यांनी संपूर्ण डिझाइन नव्याने विकसित केले.
चपलेची रचना, जडणघडण, नक्षीकाम आणि वजनाचा सखोल अभ्यास करून अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर हे विशेष कोल्हापुरी चप्पल तयार करण्यात आले.
कोल्हापुरी चप्पलेच्या जोडीची किंमत तब्बल 85000 रुपये आहे. जी तब्बल ५१ हजार रुपयांना इटलीतील एका व्यक्तीने ती खरेदी केली आहे. यामुळे कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पोहोचली आहे.