Sakshi Sunil Jadhav
घरात रोज बनवली जाणारी पोळी अनेकदा थोड्या वेळातच कडक होते. त्यामुळे जेवणाची चव कमी होते. मात्र, काही सोप्या किचन ट्रिक्स वापरून पोळी दिवसभर मऊ आणि ताजी ठेवता येते.
थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने पीठ मळल्यास पोळी जास्त मऊ राहते.
पीठ मळताना १–२ चमचे तेल किंवा तूप घातल्यास पोळी कोरडी पडत नाही.
मध्यम मऊ पीठ केल्यास पोळी छान फुलते आणि कडक होत नाही. त्यामुळे जास्त कडक किंवा चिकट पीठ मळू नका.
पीठ मळल्यानंतर किमान १५ मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवा. तसेच पोळी लाटताना जास्त सुकं पीठ वापरल्यास ती कडक होते याची काळजी घ्या
खूप गरम किंवा कमी गरम तव्यावर पोळी भाजल्यास ती नीट मऊ राहत नाही.
दोन्ही बाजूंनी हलकी भाजली की लगेच उतरवा. गरम पोळी कापडात किंवा डब्यात झाकून ठेवल्यास ती सुकत नाही.
गरम पोळीवर थोडंसं तूप लावल्यास ती बराच वेळ मऊ राहते. त्यामुळे तूप लावायला अजिबात विसरू नका.