Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Shreya Maskar

१ नंबर चप्पल कोणती?

बाजारात अनेक चप्पल, शूज येतात मात्र एक अशा चप्पल आहे, जी कधीच फॅशन ट्रेंडच्या बाहेर जात नाही. ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल होय. कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राची शान आहे. त्या केवळ चपला नाहीत, तर त्या आपल्या देशाची संस्कृती, येथील कारागिरांची मेहनत आणि त्यांचे कौशल्यही दर्शवतात.

Footwear | pinterest

कोल्हापुरी चप्पल

महाराष्ट्रातील कोल्हापूरचे प्रतीक असलेली ही कोल्हापुरी चप्पल त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भारतीय शैली आणि टिकाऊपणामुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे. आजकाल बाजारात याच्या सुंदर डिझाइन्सही पाहायला मिळतात.

Kolhapuri Chappal | pinterest

फॅशन स्टाइल

आज महिला असो वा पुरूष दोघेही कोल्हापुरी चप्पल स्टाइल करताना दिसतात. लहान मुलं देखील आवर्जून कोल्हापुरी चप्पल घालतात. ज्यामुळे तुमची फॅशन स्टाइल एका उंचीवर जाऊन पोहचते.

Fashion Style | pinterest

इतिहास

कोल्हापुरी चप्पलांचा इतिहास १२व्या किंवा १३व्या शतकापासून सुरू होतो. कोल्हापुरी चप्पलांमध्ये पाय देखील सुरक्षित राहतात. तसेच या चप्पलांमध्ये आरामात चालता येते.

History | pinterest

फॅशनचा ट्रेंड

पूर्वीच्या काळात कोल्हापुरी चप्पल खूप पातळ होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना लहान पट्ट्या होत्या. त्या काळात कोल्हापुरी चपला 'कानवाली' म्हणूनही ओळखल्या जात होते. मात्र आता काळानुसार कोल्हापुरी चप्पलमध्ये अनेक बदल झाले आहेत. ती अधिक आकर्षक दिसते.

Fashion Trends | pinterest

नऊवारी साडी

कोल्हापुरी चप्पल हा भारतीय पारंपरिक पोशाखांचा अविभाज्य भाग असून ती कोणत्याही एथनिक लूकला अधिक रुबाबदार बनवते. तुम्ही पैठणी, नऊवारी, सिल्क साडीसोबत कोल्हापुरी चप्पल घालू शकता. तसेच कॉटन कुर्ता, लेहेंगा , अनारकलीवरही कोल्हापुरी चप्पल शोभून दिसते.

Nauvari Saree | pinterest

डिझाइनर वनपीस

कोल्हापुरी चप्पल वेस्टर्न कपड्यांवर स्टाईल करून एक आकर्षक इंडो-वेस्टर्न लूक मिळवता येतो. जीन्स आणि क्रॉप टॉप, मॅक्सी ड्रेस किंवा लाँग स्कर्ट, डिझाइनर वनपीस, डेनिम शॉर्ट्स किंवा स्कर्ट आणि जंपसूटवरही कोल्हापुरी चप्पल घालू शकता.

One-Piece Dresses | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | pinterest

NEXT : घरंदाज अन् शालीन लूक हवाय? नऊवारी साडीवर शिवा 'या' पॅटर्नचं ब्लाउज

Nauvari Saree Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...