ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा आणि विविध संस्कृतीने नटलेले शहर आहे. येथे फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय सुंदर हिल स्टेशन म्हणजे पन्हाळा हिल स्टेशन. उन्हाळ्याच्या सुट्टीत येते नक्की जा.
येथे पाहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. जी पर्यटकांना आकर्षित करतात.
येथे तुम्ही ऐतिहासिक किल्ला म्हणजेच पन्हाळा किल्ल्याला भेट देऊ शकता.
पन्हाळा जवळील पराशर गुहा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जिथे महर्षी पराशर राहत होते.
पन्हाळ्यापासून सुमारे 5 किमी अंतरावर आशियातील सर्वात मोठ्या पठारांपैकी एक असलेले मसाई पठार देखील आहे.
पन्हाळ्यात सज्जा कोठी, अंबाबाई मंदिर आणि सोमेश्वर टँक अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.