ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मूग डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, आलं, लसूण कोथिंबीर, सुकलेली लाल मिरची, हळद, हिंग, तूप आणि मीठ
मूगाच्या डाळीला १ तासासाठी भिजत ठेवा.
कुकरमध्ये गरजेनुसार पाणी घालून ३ ते ४ शिटी देऊन डाळ शिजवा.
एका पॅनमध्ये तूप घालून यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मसाला शिजवा.
आता, यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली डाळ घालून ७ ते ८ मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवा.
तडका पॅनमध्ये तूप गरम झाल्यावर यामध्ये जीरा, सुकलेली लाल मिरची, आलं लसूण आणि हिंगचा तडका द्या. हा तडका डाळीवर घालून आणि २ मिनिटानंतर मिक्स करा.
मूग डाळ तडका तयार आहे. गरमागरम भातासोबत ढाबा स्टाइल मूग डाळ तडका सर्व्ह करा.