ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाल खोबऱ्याची उधळण करत दख्खनचा राजा श्रीक्षेत्र 'ज्योतिबाची चैत्र यात्रेला' प्रारंभ झाला.
श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे 'लोकदैवत' म्हणून प्रसिद्ध आहे.
कोल्हापुरातील या यात्रेचा आज 'तिसरा' दिवस आहे.
या चैत्र यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
'जोतिबाच्या नावानं चांगभलं' चा जयघोष करत राज्यभरातील मानाच्या सासनकाट्या ज्योतिबा डोंगरावर पोहचत असतात.
या यात्रेनिमित्ताने ज्योतिबा डोंगरावर सासन काट्यांची 'पारंपरिक' पद्धतीने मिरवणूक निघते.
यात सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणं, तोरण्या सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं.
साधारण या यात्रेत येणाऱ्या अनेक सासनकाठ्यांपैकी '१०८' काठ्या मानाच्या असतात त्यांना देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान दिला जातो.
गुलाल-खोबरे ,बंदी नाणी यांची पालखीवर उधळण होते, विशेष म्हणजे यात अत्यंत मोठ्या उंचीच्या फुलांनी सजवलेल्या सासनकाट्या असातात,जे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असतात.