ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रिंकू राजगुरु सध्या खूप चर्चेत आली आहे.
रिंकू राजगुरुचा कृष्णराज महाडिकांसोबतचा फोटो व्हायरल झाला होता.
या फोटोंवरुन चाहत्यांमध्ये रिंकू आणि कृष्णराज यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, यावर कृष्णराज महाडिकांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही फक्त मित्र आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नुकतेच रिंकू राजगुरुने व्हॅलेंटाईन डेनिमित्त पिंक साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
कोल्हापूरच्या भावी सुनबाई, एक नंबर वहिनी अशा कमेंट्स रिंकूच्या फोटोवर आल्या आहेत.