Shreya Maskar
कोलाड हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. हे गाव मुंबईपासून दक्षिणेस सुमारे १२० किमी अंतरावर, मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले आहे.
कोलाड येथे भारतात वर्षभर 'व्हाईट-वॉटर राफ्टिंग'ची सुविधा येथे उपलब्ध असते. आयुष्यात एकदा तरी या सौंदर्याचा अनुभव घ्या.
कोलाड हे कुंडलिका नदीवर व्हाईट-वॉटर राफ्टिंगसाठी सर्वात प्रसिद्ध आहे, त्याला 'महाराष्ट्राचा ऋषिकेश' म्हटले जाते.
येथील लोकप्रिय ठिकाणांवर कयाकिंग, कॅनोइंग, रिव्हर झिप-लाइनिंग, वॉटरफॉल रॅपलिंग आणि बंजी जंपिंग यांसारख्या खेळांचा आनंद घेता येतो.
सह्याद्री पर्वत रांगांच्या कशीत वसलेल्या या गावात हिरवीगार खोरी आणि धुक्याची चादर ओढलेले डोंगर पाहायला मिळतात.
पर्यटक अनेकदा भिरा धरण, देवकुंड धबधबा आणि तळा किल्ला व अवचितगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी देतात.
मुंबईहून ट्रेनने प्रवास करून थेट कोलाड रेल्वे स्टेशनला उतरा. तेथून पुढे रिक्षाने फिरू शकता. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.