Shreya Maskar
कोकम सरबत बनवण्यासाठी कोकम फळ, साखर, गूळ, पाणी, जिरे पावडर, आले पावडर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
कोकम सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम कोकम 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवा.
कोकममधील बिया वेगळ्या काढून घ्या.
कोकमला १० ते १५ पाण्यात उकळून घ्या.
कोकमच्या पाण्यात चवीनुसार साखर आणि थोडा गूळ घालून ढवळत रहा.
कोकम सरबतची चव वाढवण्यासाठी यात जिरे पावडर आणि आले पावडर घाला.
तयार मिश्रण थंड करून चाळणीतून गाळून घ्या.
अशाप्रकारे तयार झालेले कोकम सरबत थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.