Shreya Maskar
फणसाचे कुरकुरीत वेफर्स बनवण्यासाठी कच्च्या फणसाचे गरे, खोबरेल तेल, हळद, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
फणसाचे वेफर्स बनवण्यासाठी सर्वप्रथम फणसाचे गरे काढून त्यातून बिया वेगळ्या करा.
फणसाच्या गऱ्यांचे लांब तुकडे करून घ्या.
एका पॅनमध्ये खोबरेल तेल टाकून व्यवस्थित गरम करून घ्यावे.
गरम तेलात हे गरे खरपूस तळून घ्या.
एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात हळद, मीठ घालून मिक्स करा.
आता हळदीचे मिश्रण गऱ्यांवर टाका आणि मिक्स करा.
थोडे वेळाने टिश्यू पेपरवर गरे काढून घ्या, जेणेकरून जास्तीचे तेल कमी होईल.