ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिरवा निसर्ग आणि अथांग समुद्राची सुंदरता लाभलेला कोकण.
कोकणात हिरवी झाडी, पांढराशुभ्र समुद्र एकाच ठिकाणी पाहायला मिळतो.
सुट्टयांमध्ये शांत ठिकाणी जायचे असेल तर कोकण हा सर्वोत्तम पर्याय आहे.
गणपती बाप्पाचे सुंदर मंदिर असलेले गणपतीपुळे निसर्गाने समृद्ध आहे.
तारकर्ली समुद्रकिनारा हा खूप सुंदर आहे. स्वच्छ पाणी आणि पांढरीशुभ्र वाळू यासाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे.
सिंधुदुर्ग किल्ला ही ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्याच्या बाजूला समुद्र आहे. किल्ल्यावरुन सुर्यास्त पाहणे हा नयनरम्य देखावा असतो.
कोकणात भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तम जेवण. मांस, मच्छी आणि मासांहारी पदार्थांसाठी कोकण प्रसिद्ध आहे.