Manasvi Choudhary
दहीहंडी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचत नवा विश्वविक्रम केला आहे.
ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने थर लावले आहेत.
या पथकाने आता स्पेनमधील पथकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
जोगेश्वरीतील कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावले आहेत.
कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचल्यानंतर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.