ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होते. कोजागिरी पौर्णिमेला मसाले दूध पिण्याची परंपरा तशी खुप जुनी आहे.
कोजागिरी पौर्णिमेला मसाले दूध कसे बनवायचे ते जाणून घेवूया.
दूध, बदाम, पिस्ता, काजू, वेलची पावडर, जायफळ , केशर आणि साखर
बदाम आणि पिस्तासारखे सुके मेवे कोमट पाण्यात भिजवत ठेवणे. जेणेकरुन ते मऊ पडून किसायला सोपे जाईल.
भिजत ठेवलेले ड्रायफ्रुट्स, वेलची आणि जायफळ मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करुन घ्या.
एका मोठ्या भांड्यात दूध घेऊन ते गरम करा आणि छान उकळवून घ्या.
उकळलेल्या दूधात तयार केलेली मसाले पेस्ट टाका आणि तुमच्या अंदाजानुसार साखर टाकून दूधात सगळे एकजीव होईपर्यंत ढवळा.
सर्व मसाले एकजीव झाल्यानंतर दूध जाडसर होईपर्यंत उकळली घ्या आणि त्यात केशर टाका म्हणजेच दूधाची चव चांगली लागेल.
कोजागिरीकरिता मसालेदार चविष्ट दूध तयार आहे.