ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोकांच्या मनात नेहमी हा प्रश्न येतो तो म्हणजे खरंच मध कधीच खराब होत नाही का?
तर होय , जर मध नैसर्गिक असेल तर ते खराब होणार नाही.
मधापासून आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळते.
मधाच्या भांड्यांमध्ये घाणेरडे चमचे वापरणे टाळा.
शुध्द मध हे बंद डब्यात आणि कोरड्या थंड जागेत ठेवावे.
थंड जागेत ठेवल्याने मध वर्षानुवर्षे सुरक्षित राहते आणि खराब होत नाही.
दररोज रोज एक चमचा मध गरम पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते.
तसेच घसा खवखवणे आणि खोकला यांसारख्या समस्या दूर करण्यास मध मदत करते.