Manasvi Choudhary
नवरात्रोत्सव संपल्यानंतर सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेची उत्सुकता असते.
कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात.
यंदा कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 25 ऑक्टोबर 2026 रोजी साजरी होणार आहे.
पंचांगानुसार, अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11:56 वाजता सुरू होऊन 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:41 वाजता समाप्त होईल.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शनानंतर मसाला दूध किंवा खीर चंद्रप्रकाशात ठेवण्याची परंपरा आहे.
25 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 4:42 ते 6:42 हा पूजेसाठी शुभ काळ असल्याचे सांगितले जाते.
मात्र, स्थानानुसार मुहूर्तात फरक असू शकतो. तरी पूजा करण्यापूर्वी स्थानिक पंचागानुसार मुहूर्त तपासून घ्या.