Saam Tv
कोजागिरी पौर्णिमा २०२४ अश्विन महिन्यातील १६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यालाच शरद पौर्णिमा असेही म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमा १६ ऑक्टोबरला संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुरु होणार आहे. तर १७ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होणार आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि ओडिसा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.
वास्तुशास्त्रानुसार कोजागिरी घरात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोबत नवीन सुनेची सुद्धा ओवाळणी केली जाते.
मिथिला या भागात मखान्याचे सेवन शुभ मानले जाते. मखाणे हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते.
हिंदू धर्मानुसार कोजागिरीला मखाणे खाणे खूप शुभ मानले जाते.
या दिवशी आपण देवीच्या नैवेद्यात मखाण्यांचा समावेश केला पाहिजे.
तुम्ही कोजागिरी निमित्त मखाण्याची खीर तयार करुन देवीला नैवेद्य तयार करु शकता.
NEXT : बॉलिवूडच्या ड्रीम गर्लचा 'हा' प्रवास तुम्हाला माहितीये का?